Back to feed
A
Aadhya Kulkarni Love · Marathi · Romantic

P मीच निरंतर बोलत राहतो तू फक्त मला पाहत राहते तुझ्या एकटक पाहण्याचं कारण मला तुझ्याकडून ऐकायचंय मी भरभरून बोलत जातो तू मौन धरून ऐकत राहतेस तुझ्या शब्दांना कैद ठेवण्याच कारण मला तुझ्याकडून ऐकायचंय माझ्या शब्दांना दिलखुलास दाद देणं प्रत्येक शब्दांचा अर्थ समजावून घेण तुझ्या या देवाणघेवाणीच कारण मला तुझ्याकडून ऐकायचंय माझ्यावर कि माझ्या शब्दांवर तुझ प्रेमच मला कळत नाही मग…. शब्द अगोदर कि मी ?? मला तुझ्याकडून ऐकायचंय मी नेहमीच्या जागी वाट पाहणं तू नेहमीप्रमाणेच उशिराने येणं तुला उशीर होण्याचं नवीन कारण मला खरंच तुझ्याकडून ऐकायचंय….

175 likes 22 shares
WhatsApp