```Tuesday, 27 March 2018``` *८५२🍁सर्वात मोठे आश्चर्य.!* "न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते" हे गीतावचन पुष्कळांनी देव्हार्यात ठेवले आहे. ते आचरणात न आणता लोक झगडे का करीत बसतात हे धर्मराजापासून ज्ञात्यांना कोडे आहे. यक्षाने धर्मराजाला विचारले, _"राजा, या जगात सगळ्यात मोठे आश्चर्य कोणते?"_ धर्मराज म्हणाले, _"आश्चर्य असे की रोज हजारो यमाच्या मुखात तडफडत शिरताना दिसतात तरी उरलेले लोक असे बेफिकीरपणाने आयुष्य काढतात, की जणू अमरपट्टा घेऊन आले आहेत."_ *भक्ती की ज्ञान याचा विवेक अखेरीला ज्याचा त्याने, आपल्या शक्तीप्रमाणे, करायचा आहे.* स्वामी विज्ञानानंद
151 likes
75 shares