Back to feed
D
Dhruv Bhat Love · Marathi · Romantic

❤💗❤💗 तिला ठाऊक होतं ...त्याचं आपल्यावर अतोनात प्रेम आहे तिचंही होतंच, कदाचित त्याच्यापेक्षा जास्तच ! दोघंही प्रेम करत होते एकमेकांवर जीवापाड ... दोघांना ही होती मनापासून याची जाणीव ... त्यालाही काही विचारायचं होतं , तिलाही काहीतरी बोलायचं होतं , पण ... दोघांनी सारं मनातच ठेवलं होतं ! शेवटी तिला सुचली एक कल्पना ... नेहमीप्रमाणे भेटले दोघे एकदा एकांतात ... ती लाडात येऊन म्हणाली , काल मला एक स्वप्नं पडलं ... स्वप्नात कोणीतरी मला propose केलं ... त्याने न राहवून विचारलं, मग उत्तर काय दिलंस ? ती म्हणाली " हो शिवाय दुसरं काही सुचलंच नाही " त्याने उत्सुकतेने विचारलं " कोण होता ? सांगशील का ? " ती लाजून म्हणाली " वेड्या ! तूच , आणखी कोण ? " तो खूश झाला, तिचा चेहरा आपल्या हातात धरून म्हणाला " खरंच ? माझ्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं " ती गालातल्या गालात हसली ... आणि म्हणाली " हो ..... मलाही ! " ❤💗❤💗

0 likes 0 shares
WhatsApp