sorry नाही समजू शकलो तुला नाही वागलो तुझ्या अपेक्षेसारखं तू दिलखुलास जगायचीस पण मी तसा नाही राहू शकलो sorry , तुझ्यासारखे छंद ना जपू शकलो ना तुझ्या आवडीनिवडीशी एकरूप झालो तू सगळं मन मोकळं बोलायचीस पण मी नाही तसा बोलू शकलो sorry तुझ्या घरच्यांमधे ना मिसळलो ना ही तुझ्या मित्रांसोबत रमलो माझ्याच पद्धतिने जगत राहिलो तुझी पद्धत आजमावू ना शकलो पण एक गोष्ट होती या सर्वांवर वेड्यासारखा मरत होतो तुझ्यावर तुझ्याच आठवणीत असायचो दिन रात तूच असायचीस माझ्या श्वासाश्वासात sorry पार केली मी हद्द मैत्रीची अन तुझ्यात गुंतून गेलो नव्हती तुझी इच्छा तरीही मी कविता रचत राहिलो ही कविता लिहिली तुझ्यावरून राग जरासा बाजूला ठेवून माझ्या डोळ्यातलं प्रेम आठवून वाचशील ना असशील तिथून
0 likes
0 shares