अगदीच निराळी माझी मैत्री.. निराळा तो मैत्रीचा कट्टा.. रोजच आम्ही भेटतो आजही तसेच भेटू.. तिथेच भेटू.. त्या तिथे कॉलेजच्या त्या गार्डनमध्ये...!!! आमचे लेक्चर वेगळे असतात जरासे.. क्लास आमचे भरतात.. त्या तिथे कॉलेजच्या त्या गार्डनमध्ये...!!! आम्ही तर पाहतो सुंदर सुंदर मूलीना.. वाटत ती जॉइन व्हाव आमच्या ग्रुपमध्ये.. अधाश्या सारख्या नजरा सतत धावतपळत असतात.. कुणाच्या तरी पाठीमागे.. त्या तिथे कॉलेजच्या त्या गार्डनमध्ये...!!! प्रेमासाठी मदत म्हणून.. अशी ती आमची मैत्री.. बहिणीसाठी भाउ म्हणून अशी ती आमची मैत्री.. भांडनात सदैव तयार अशी ती आमची मैत्री...!!! कायम एकमेकांसाठी एकमेकांच्या मनात असलेली रंगीबेरंगी मैत्री कायम फुलते.. त्या तिथे कॉलेजच्या त्या गार्डनमध्ये...!!! गोड गुलाबी प्रीतीच्या फुलासारखी.. पांढर्या शुभ्र फुलासारखी स्वच्छ अशी आमची ती मैत्री.. आजही फुलते त्या तिथे कॉलेजच्या त्या गार्डनमध्ये.💐🌹🌹🌻
222 likes
32 shares