"अंधार फार झाला" असा का आसवांचा डोळ्यास भार झाला हल्ल्याचा भास नाही साक्षात वार झाला बसल्या अबोल जखमा हुंदकेही अबोल न मारताही तीर तो काळीज पार झाला हुरहुर श्रावणाची ती आटून कधीच गेली फसवा हरेक ऋतू जेव्हा पसार झाला घेऊ नको तू शल्य शमवू दे या क्षणाला आहे रात्र सावल्यांची अंधार फार झाला
101 likes
58 shares