Back to feed
P
Prisha Mishra Love · Marathi · Romantic

अन प्रेम करायच राहुनच गेलं... तिच्या घरच्यांशी असनारी जवळीक, प्रेमाच्या आड येउन बसली.. जीव तिच्यावर जडुनही, मनाला मुरड आम्ही घातली.. मनं मारायचं कामच आम्ही उभ्या आयुष्यात केलं, अन प्रेम करायच राहुनच गेलं... तिचा होकार असतानाही, तिच्या घरच्यांचाच विचार केला.. सारा विचार करुन, तिला नकारचं दिला.. उपकारांच्या ओझ्याखाली, त्यांनी आम्हाला खोलवर गाडलं.. अन प्रेम करायच राहुनच गेलं... एक नाते जोडावे कि चार नाती तोडावी.. हे आम्हाला कधी, समजलेच नाही.. झाडाचा बुंधा सोडून फांद्याशी नाते जोडने, जमलेही नाही.. फुलण्या आधिच कळ्यांना (प्रेमाला) कोमेजताना पाहिलं, अन प्रेम करायच राहुनच गेलं..

0 likes 0 shares
WhatsApp