Back to feed
N
Nisha Mehta Love · Marathi · Romantic

अपेक्षांच्या भाऊगर्दीत जीव बरेचदा गुदमरतो गं जबाबदाऱ्यांच्या जुगाडाखाली मी कायम राबतोय गं यावर माझा इलाज एकच वाटते तू छानसं हास गं कामातही होतं राजकारण मी ठरतो टुकार कार्यकर्ता गं धिराचाही होतो कडेलोट धरण वाटते कधी फुटेल गं यावर माझा इलाज एकच वाटते तू छानसं हास गं कुठे कसा पुरे पडू सांग माझी जमवाजमव अपुरी गं धागा सुटतो हातून कायम मी सदाचाच असतो अपूर्ण गं यावर माझा इलाज एकच वाटते तू छानसं हास गं गरज कुणाला या सर्वावर मद्य न रतीच्या धुंदीची गं कधी कुणाचा कधी कुणाचा आपुला आपुला उपाय गं यावर माझा इलाज एकच वाटते तू छानसं हास गं

0 likes 0 shares
WhatsApp