Back to feed
K
Kiara Rao Love · Marathi · Romantic

अबोल तू अजुनी लपून शोधती डोळ्यांत बोलती खुलून हासती ही बाहुली हळूच लाजुनी गालात हासुनी केसांत लपूनी अशी लाजे शब्दांतील प्रेम अचूक जाणूनी मन समजुनी तिही घेते अबोल वागुनी हद्यात लपते प्रेमही असते मनी तिच्या मलाही असते ओढ या भेटीची अबोल तरिही तु असती एकटी लपूनी स्वताला शोधती एकदा बोलुनी जरा बघ कितिक जाळते स्वतः काळजाला एकट्या हद्यात तुच असे बहाणे पाहतो नेहमीच तुझे समजुनी घेतो मी नेहमी कितीक वेळा तू अशी अबोल राहशील तुझ्याच काळजाला सारखीच जाळशील एकटीच लपुनी अशी कविता माझ्या वाचशील कवितेत मग सारखी तुलाच पाहशील बोलशील मग पुन्हा तेच बहाणे शोधशील पुन्हा माझेच पोरके शब्द तरिही तू पुन्हा अबोल राहशील अबोल राहुनी पुन्हा हद्यात राहशील अबोल राहुनी पुन्हा हद्यात राहशील

0 likes 0 shares
WhatsApp