अबोल शब्दः तुझे आणि माझे ......... वर्षा मागून वर्ष सरत गेली तुझे शब्द अजून अबोल राहिले आता या शब्दांची आतुरता उरली नाही मनात माझ्या तुझ्याबद्दलची ती भावना उरली नाही उगाच चुकीच्या विचारांनी घर बांधले होते विचाराचे हे घर आता पूरग्रस्त झाले होते आलेल्या या पुरला कारण आहे कोणाचे ? आहे तुझ्या अबोल शब्दाचे आणि माझ्या आपेक्षेचे अपेक्षेचे वजन आता मला पेलवत नाही आता माझ्या मनात काही विचार येत नाही अपेक्षेने काही साध्य होत नाही , आता कळले, पाहिजे ते आपल्याला मिळतेच असे नाही आता मी माझ्या साठी जगणार आहे कर्तव्य भान आता मी ठेवणार आहे , नको मला आता तुझे शब्दः आता मी अबोल होणार आहे ......... 💝💝💝💝💝💝—
0 likes
0 shares