Back to feed
K
Kiara Yadav Love · Marathi · Romantic

अभिनेत्रीं अश्विनी एकबोटे यांचे पुण्यात निधन, हृदयविकाराचा तीव्र झटका पुणे : अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांचे निधन झाले. भरत नाट्य मंदिरात प्रयोग सुरु असताना ह्दयविकाराचा झटका आला. त्यांना तात्काळ खासगी रुग्णालात दाखल करण्यात आले. मात्र, त्याचा काहीही उपयोग झाला नाही. पुण्यातील भरत नाट्य मंदिरात नाट्य त्रिविधा हा कार्यक्रम सुरु होता. त्यावेळी अश्विनी एकबोटे उपस्थित होत्या. त्यांच्या अचनाक जाण्याने मराठी चित्रपटसृष्टीत आणि रंगभूमीवर शोकळला पसरली आहे. शरद पोंक्षे यांच्यासोबत त्यांनी अनेकवेळा काम केले.

198 likes 76 shares
WhatsApp