Back to feed
A
Anika Iyer Motivation · Marathi · Motivation

अमेरिका स्वतंत्र झाल्यानंतरची ही एक घटना आहे *रस्त्याच्या कडेने जात असताना एक लष्कराची गाडी अडचणीच्या जागेत अडकली. गाडीतील* *शिपाई उतरून तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न करू लागले. त्यांच्या वरचा अंमलदार फक्त हुकुम देत* *होता. त्यांने मदत केली असती तर गाडी लगेच निघाली असती, पण तो साहेब होता. हुकुम देत* *नुसतेच उभे राहिला. तेवढ्यात तिकडून एक गाडी आली. त्यातून एक सज्जन उतरले. आणि गाडी* *बाहेर काढण्यासाठी मदत करू लागले. त्यांच्या मदतीमुळे गाडी लगेच बाहेर निघाली. दुसऱ्या* *गाडीतुन आलेला तो सज्जन त्या अंमलदाराला म्हणाला, पुन्हा गरज पडली तर मला बोलावत जा.* *आणि त्यांनी आपल्या कोटाच्या खिशात हात घातला. आपला पत्ता असलेले कार्ड बाहेर काढल* *आणि त्या अमलदाराला दिले. त्यांनी ते पाहिलं आणि त्याला दरदरून घाम फुटला. कारण मदतीला* *आलेला तो सज्जन अमेरिकेचा राष्ट्रअध्यक्ष जॉर्ज वाशिंग्टन होता.* 🔵तात्पर्य :- सत्कृत्यासाठी कष्ट करताना आपण आपलं पद, प्रतिष्ठा आणि अहंकार या गोष्टी बाजुला* *ठेवल्या पाहीजेत. पद नव्हे तर नम्रता, विचारांची उंची, कर्तृत्व हा तुमचा मोठेपणा ठरवतात....!!..*

47 likes 86 shares
WhatsApp