Back to feed
A
Aditya Pawar Love · Marathi · Romantic

अशी जगावी गज़ल या उपक्रमात माझा सहभाग .. अचानक वादळी पाऊस आला छत्री उडून गेली बेधुंद पावसात पाऊलं वाट चुकून गेली एक एक गोपिका जणू कृष्णात मिसळून गेली रात्र शरदाची सुंदर खेळूनी रास गेली शेवटची भेट तुझी चिंब रडवून गेली पुढे कितीतरी दिवस कोरड पडून गेली कहाणी आपुली जुनीच पुन्हा जगून गेली मुलांना सांगतांना परिकथा होऊन गेली प्रेम नाही सोपे सखे सांगून मीरा गेली घोट विषाचे ती बेधडक पिऊन गेली उंच आकाशात पिल्लं दूर निघून गेली मोकाट घरटी आता एकटी राहून गेली

243 likes 42 shares
WhatsApp