अश्रूं ही संपलेत माझे, तुझ्या आठवणीत रडून, मलाच मी विसरलोय गं, तुझी आठवण काढून..... तुझ्याविना अधुराच राहीलो मी, कोठून आणू मी तुला शोधून, ना जाणलेस कधी मन माझे, गेलीस ना शेवटी एकटं सोडून ..... सगळी वचने खोटीच दिली, जिँकलीस ना तू मला हरवून, शेवटी तोडलसं ना गं नातं, गेलीस ना मला परकं करुन ..... कधी तरी समजशील मला, माझ्या ख-या प्रेमाला, एवढीच एक अपेक्षा आहे, माझी तुझ्या कडून..... सत्यात नाही भेटलीस, तरी चालेल गं मला, न चुकता रोज भेटत जा, मला स्वप्नात येवून.....!!!!💝💝💝💝💝💝💝
0 likes
0 shares