असं असतं का प्रेम ............? एक डॉक्टरांकडे एक ८०-८५ वर्षाचे म्हातारे ग्राहस्थ आपल्या जखमेचे टाके काढून घ्यायला गेले. सकाळी ८.३० वाजताच सुमार. ते डॉक्टरांना म्हणाले थोड लवकर होईल का काम ? मला ९ वाजता एकीकडे जायचे आहे. डॉ. समोर त्या क्षणी काहीच काम नव्हतं. त्यांनी जखम तपासली सामानाची जमवा जमाव केली आणि टाके काढायची तैयारी केली. दरम्यान ते त्या ग्राहस्थांशी गप्पा मारत होते. " आजोबा ९ वाजता दुसऱ्या डॉ. कडे जायचं आहे का..?" "नाही मला ९ वाजता माझ्या बायकोबरोबर नाश्ता करायला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जायचं आहे." "हॉस्पिटल मध्ये....? आजारी आहेत का त्या...?" "हो ! गेली पाच वर्षे हॉस्पिटल मधेच आहे..ती.." "अच्छा ! आणि तुम्ही वेळेवर गेला नाहीत तर वाट पाहतील न त्या..?काळजीही करतील ?" "नाही डॉक्टर तिला अल्झायमर्स झालाय . ती गेली पाच वर्षे कोणालाच ओळखत नाही." आजोबा शांतपणे म्हणाले. डॉ.चकित होऊन म्हणाले, "आणि तरीही तुम्ही रोज त्यांच्याबरोबर नाश्ता करायला इतक्या वेळेवर आणि धडपडून जाता....? त्या तुम्हाला ओळखतही नसताना..?" त्यावर तितक्याच शांतपणे आजोबा म्हणाले.... "डॉ. ती मला ओळखत नसली तरी मी तिला गेली कित्तेक वर्षे ओळखतो..... माझी बायको आहे ती ..आणि माझ जीवापाड प्रेम आहे तिच्यावर............." ऐकता ऐकता डॉ. अंगावर रोमांच उभे राहिले. गळा दाटून आला. त्यांच्या मनात आल. "हे खर प्रेम. प्रेम म्हणजे काही नुसत घेण नव्हे, तर त्या बरोबर काहीतरी देन. निरपेक्ष पणे स्वतः कडचा आनंद लुटवाने, उधळण त्या ग्राहस्था सारख. अचानक एक संदेश डॉ.नां आठवला.... `चांगल्या लोकांच्या वाट्याला नेहमीच सगळ सर्वोत्तम येत असं नाही, पण जे वाट्याला येत त्यातलं सर्वोत्तम शोधून ते आयुष्य साजर करतात. यालाच आयुष्य म्हणायचं. आपल्या माणसाला आहे तास स्वीकारणं आणि आपल्या दोन्ही हातांनी आपल्या सर्वस्वाने त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करनं.
0 likes
0 shares