असं प्रत्येक भावाने केलं पाहिजे व्हेलेँटाईन डे येताच गणेश च्या चेहऱ्यावर एक वेगळच स्मीत हास्य दिसून यायचं.. . एका मंदिराच्या शेजारी असलेल्या दुकानावर काम करणारा हा गणेश.. . ह्या वेळेस पण खुप सारी गुलाबाची फुले विकत घेऊन आला.. . गणेश ला माहिती नव्हतं कि व्हेलेँटाईन डे काय असतो? . पण त्याला हे माहीत होतं आजच्या दिवशी दहा रुपयाला विकले जाणारे गुलाब ५० रुपयाला विकले जाते.. . तो सकाळ पासून धावपळ करत होता.. त्याला वाटलं आज चांगली कमाई होणार.. त्याचे दोन-तीन तासात सगळी फुल विकली गेली... . त्याने पटकन पैसे मोजले आणि त्या पैशातून ५०० रुपये बाजूला ठेवले.. . तो त्याच्या मालकाकडे गेला आणि त्याची असलेली उधारी त्याने देऊन टाकली . आणि पळत पळत बाजारात जाऊन गोखले काकांच्या दुकानावर गेला.. . गोखले काका-अरे गणेश आज खुप लवकर आलास? . गणेश-काका आज १४ फ्रेब्रुवारी आहे ना.. . गोखले काका-हो मी तर विसलोच होतो.. . बोल काय पाहिजे तुला?? . गणेश-ती हिरव्या रंगाची फ्राँक दाखवा ना... . गोखले काका-अरे महाग आहे तु घेशील का? ४८० रुपयांची आहे.. . गणेशने विचार केला आणि म्हणाला.. काका करा पैक.. आता त्याच्याकडे २० रु राहिले तो काकांना म्हणाला, काका २० रुपयांची डेरी मिल्क पैक करा.. . गणेशने ५०० रु काकाला देऊन आपल्या घराकडे वाट गाठली.. . . घरी गेल्यावर आईल म्हणाला.. . आई.. आई.. छोटी कुठेय?? . आई-आत मध्ये बसलीय.. . . गणेश छोटी जवळ गेला आणि तिला मिठी मारुन म्हणाला.. . हैप्पी व्हेलेँटाईन डे...!! . . . विचारा विचारांचा फरक आहे. प्रेम तर प्रेम असतं..!!
0 likes
0 shares