Back to feed
A
Anaya Mehta Love · Marathi · Romantic

आई ऊपकार तुझ्या दुधाचे ...... आई ऊपकार तुझ्या दुधाचे कसे फेडु गं आई | रक्ताच पाणी केलस तु किती गं माझे आई | सारे विश्व तुझेच गुण गाण गाई आई | पहीला-वहिला मान विश्वात तुलाच गं आई || वात्सल्य तुझे अमोल,माया तुझी अफाट | गाऊ किती महती तुच सांगणा गं आई || जन्म देवुनी तु विश्व दाखवीलेस गं आई | कशा वेदणा सहण केल्यास तु गं आई || लहाण पणा पासुनचं साभाळस गं आई | सारा वेळ तु माझ्यातच खर्च केलासं आई || अनमोल असं जीवन तु मला दिलं गं आई | संभाळ करतांना किती कष्ट घेतले गं आई || दुडु दुडु धावतांना मागे तु आलीस गं आई | भुके साठी घास तु भरवत राहीलीस गं आई || आता कसे ऊपकार फेडु सांगणा गं आई | थोर माझी मात,तु थोर माझी गं तु आई || संसाराचा सारा बोज झेललास गं तु आई | त्यातही माझ्यासाठी वेळ काढलास गं आई || ऊन्हा तान्हातुनही धाव घेतलीस तु गं अाई | आठवणीने माझ्या व्याकुळ झालीस गं तु आई || ऊपाशी पोटी स्वत:राहीलीस तु गं माझे आई | हळुच बघत होतीस बाळ माझं ऊपाशी तर नाही || गाईला फुटतो पान्हा तसा तुला फुटला गं आई | वेळीच माझ्यासाठी धावत राहीलीस गं अाई || वासराचा हंबरडा तुला माजाच वाटला गं आई | काट्या कुट्यातुन अणवाणी वेध घेतलास गं आई || तुझी महती मी किती गं गाऊ सांगणा गं आई | तुझ्या सारखे दैवत ह्या विश्वातरी नाही गं आई || मायेचा सागर तु ,ह्या विश्वात मान तुलाच गं आई | तुझं प्रेम ह्या जगात कोणीचं देणारं नाही गं आई || अशी तु माझी आई,वात्सल्य सिंधु आई... तुझ्या सारखे दैवत ह्या विश्वातच नाही..... तुझ्या सारखे दैवत ह्या विश्वातच नाही..... थोर तुझे उपकार आई... थोर तुझे ऊपकार.........

186 likes 78 shares
WhatsApp