Back to feed
V
Vivaan Mishra Spiritual · Marathi · Spiritual

आई घराचा आधारं आई देवळाचा पारं जीव चिखलाचा गोळा आई द्यायला आकारं... आई संसाराची नाळं आई मृदूंग नि टाळं गार सावली देणारे आई मायाळू आभाळं... आई कैवल्याची खाणं आई झिजली सहाणं ताठ राहते वाकते आई लव्हाळ्याची मानं ... आई चेहरा हासरा आई अमृताचा झरा लेक वासरु वेल्हाळ आई बनते कासरा.. आई आई आई आई !! तिच्याविण जिणं नाही आई मानावा ईश्वर दुजा देव कुणी नाही ..

84 likes 11 shares
WhatsApp