Back to feed
R
Riya Kulkarni Love · Marathi · Romantic

आज असा एकटाच बसलो होतो, तुझ्या आठवणीत थोडं फसलो होतो.. वाटलं तुझ्यावरती प्रेम करुन, मी नक्कीच कुठेतरी चुकलो होतो..!! पहिलं मनात नसताना देखील, नंतर तुझ्यावरच जीव जडला.. तुझ्या प्रेमात मला कळलंच नाही, कधी हा प्रेमवेडा राजकुमार घडला..!! बरीच स्वप्ने रंगवली, तुझ्या सोबत सजवली.. तुझ्या प्रेमाने गं माझी, सखे झोप ही उडवली..!! तुझ्या प्रेमात काहीच कळत नव्हतं, मन तुझ्याशिवाय कुठेच वळत नव्हतं.. तुझ्या प्रेमात मी वेड्यासारखा वागत होतो, प्रत्येक देवाला मी तुला मागत होतो..!! तुझ्या सोबतीचे ते दिवस, जणु स्वर्गासारखे भासत होते.. शरीरातल्या प्रत्येक कणात, मला तुझे रुप दिसत होते..!! पण काळाने असा घाव घातला , तशी तशी तू म्हणाली .... आपला प्रवास ईथपर्यंतच होता विसरून जा मला ....... ....!! काळजात धस्स झालं, हृदय अचानक फाटलं.. मला तु सोडून जाताना, रक्त डोळ्यात साठलं..!! वाटेतच सोडायचं होतं, तर जवळ घ्यायचाच कशाला.. इतका इतका जीव लावून, जीव तोडायचाच कशाला..!! स्वप्नात देखील वाटलं नव्हतं, तु हृदय माझं तोडशील.. जीवनाच्या या वाटेवर, अर्ध्यातच मला सोडशील.....!! साथ सोडण्याचं कारण, नक्कीच काहीतरी मोठं असेल.. हृदय माझं म्हणतंय सखे, तुझं प्रेम कधीच खोटं नसेल..!! माझं काय घेऊन बसलीस, मी एकटा कसाही जगेन.. आठवण तुझी आल्यावर, एकटक फोटो तुझे बघेन..!! तुझ्या सुखात माझं सुख लपलंय, म्हणुनी सांगतो तु सुखी रहा.. आठवण आल्यावर सांगू नकोस, पण तेव्हा थोडी मुकीच रहा..!! मी जगत नाहीये स्वतःसाठी, लिहतोय कविता फक्त तुझ्यासाठी.. शेवटची इच्छा मागतोय माझ्यासाठी, आयुष्यभर सुखी राहशील ना ग..... फक्त या प्रेमवेड्यासाठी...

0 likes 0 shares
WhatsApp