Back to feed
N
Navya Bose Love · Marathi · Romantic

आज खुपच गर्दी होती बस स्टॉपवर. खुपच मोठी लाईन लागली होती. सर्वजन bus ची वाट पहात होते. तेवढ्यात त्याचा थोडा धक्का लागला तिला, ती चिडली आणि रागाने त्याला ओरडली, . तीः “का रे, दिसत नाही का तुला. का डोळे फुटले तुझे?” . तो सॉरी म्हणाला तिला, पण हिची बडबड काही केल्या थांबेनाच. मग तोही चिडला आणि म्हणाला, . . तोः “इतका कसला माज आहे गं तुला?” . तीः “मग आहेच गर्व मला, आहेच मी इतकी सुंदर. एखादी सुंदर मुलगी दिसली की लगेच तुम्ही मुलं घसरता तिच्यावर.” असं बोलुन तिनं तर त्याच्या स्वाभिमानालाच हात घातला होता. . तोः “तुझ्यासारख्या छप्पन पोरी मी म्हटलं तर उभ्या करु शकतो. पण माझा तो मुळ स्वभाव नाही. म्हणुन गप्प आहे.” . तीः “तर तर....आला मोठा दीडशहाणा. मी सर्वांपेक्षा वेगळी. मला पटवणं इतकं सोप्प नाहीये.” . तोः “असं म्हणतेस स्वीकारलं मी चॅलेंज. आजपासुन बरोबर पंधरा दिवसांच्या आत तु मला ‘I Love You’ म्हणशील आणि तेही ईथेच. आजपासुन बरोबर पंधराव्या दिवशी….. हा माझा विश्वास आहे.” . असं म्हणुन तो तिथुन टॅक्सीने निघुन गेला. ((ती मनातल्या मनात विचार करत होती की “मी काही केल्या याला ‘I Love You’ कशी आणि का म्हणेन. छे छे वेडा आहे हा.)) . कॉलेज मध्ये पोहोचल्यावर ते एकमेकांना एकाच वर्गात दिसले. त्याबरोबर दोघांनीही एकमेकांकडे पाहुन नाकं मुरडली. दोघांचं एकाच वर्गात अॅडमिशन झालं होतं. त्यामुळे ते एकमेकांना पुन्हा-पुन्हा दिसु लागले होते. त्याला पाहील्यावर तिल त्या दिवसाबद्दल राहुन-राहुन वाईट वाटत होतं. म्हणुन तिनं ठरवलं कि त्याला ‘Sorry’ म्हणावं. मग क्लासमध्ये तिची भिरभिरती नजर त्याचा शोधु लागली. . पण तो काही दिसला नाही. कदाचित आज तो आला नसेल असा विचार तिने केला. म्हणुन तिने त्याला शोधणं बंद केलं आणि Canteen च्या दिशेने ती चालु लागली. Canteen मध्ये प्रवेश केल्याबरोबर तो तिथे Coffee घेताना दिसला. मग ती त्याच्या टेबलवर जाऊन बसली. त्याला थोडं आश्चर्यच वाटलं, पण तो शांतपणे Coffee घेत राहीला. . तीः “I am sorry.” . तो थोडा दचकलाच, पण तिने आणखी एकदा ‘I am sorry’ म्हटलं. . तोः “What about?” . तीः “Bus Stop वर जे झालं त्याबद्दल.” .. . तोः “It’s ok yaar. I forgiven you. Coffee?” . तीः “No, Thank’s. मला खरँच तु माफ केलंस ना?” मि थोडं जास्तच बोलले त्यावेळी. इतकं बोलायला नको होतं मी. (हात पुढे करुन) Friends?” (त्यानेही मोठ्या मनाने तिच्याशी मैत्री केली) तो दिवस, बस स्टॉपनंतरचा तिसराच दिवस होता. त्यानंतर ते क्लासमधे पुन्हा-पुन्हा भेटु लागले. एकाच बेंचवर बसु लागले. दिवसागणिक त्यांची मैत्री वाढु लागली होती. एकमेकांच्या Notebooks Exchange करणं हे तर त्यांचं घरी येण्याजाण्याचं एक कारणच बनलं होतं. . त्याचा स्वभाव इतका छान होता की कोणालाही तो आवडावा. समोरच्याला समजुन घेऊन त्याच्याशी वागणं, त्याला मदत करणं, अडचणीच्या वेळी योग्य तो सपोर्ट करणं हा त्याचा स्वभावच होता. दिसायलाही तो बरा होता. त्या दोघांना भेटुन एक आठवडाच झाला होता की एकमेकांना ते खुपच आवडु लागले होते. दिवसानंतर दिवस गेले. आज त्याच्या पहील्या भेटीनंतरचा चौदाव्या दिवसाची रात्र आहे. . ती गच्चीवर चांदण्यांकडे बघत एकटीच बसली होती. ती मनातच म्हणत होती, “कधी कळणार रे तुला माझ्या मनातल्या भावना. बघ ती रात्रीची चाँदणी त्या चंद्राला काय म्हणतीये, ते ऐकना, माझ्या मनातल्या भावना तुला का कळेनात?” . रात्रभर असेच विचार राहुन-राहुन तिला सतावत होते, मग ती झोपी गेली. 👇👇👇👇👇👇👇👇👇 💞 थट्टा कशी नशिबाने मांडली 💞

97 likes 74 shares
WhatsApp