आज ना पिल्लू तुला बस मध्ये खूप जवळून बघितल ग आज पर्यंत फक्त तुला लांबूनच पाहत आलो खरच आज कळाल मला प्रेमात दोन जीवांच असणच गरजेच असतं मला अस वाटल यार तु पण मला विचाराव ये तु मला का पाहत असतो रे रोज जेव्हा पहाव तेव्हा तु माझ्या जवळच दिसतोस काय नाव आहे रे तुझ तुला आवडतेस का मी खूप सारे प्रश्न येतात ग मनात माझ्या तुझा आवाज ऐकला आज मनाला खूप बर वाटल तुझ्या सुंदर डोळ्यांत पाहील तेव्हा कळाल कुट तू आणी कुट मी आज मला माझ्या एकटेपणाची जाणीव झाली तु माझ्यासाठी परफेक्क आहेस ग पण मी तुझ्यासाठी परफेक्ट नाही ग मी म्हणजे एक साधारण व्यक्ती या पृथ्वीवरचा तु म्हणजे तो चंद्र ज्याला मी हातपण लावू शकत नाही आणी त्याच्या जवळ पण जाऊ शकत नाही खूप खूप भावना मी माझ्या मनात साठवत आलोय ग तुला कळेल का ग माझ प्रेम कधी
0 likes
0 shares