Back to feed
A
Aditya Malhotra Love · Marathi · Romantic

आज पुनः आपल्या नेहमीच्या ठिकाणी आलो आहे जरा वेळ तुझ्या आठवणीत स्वतःला विसरायचे आहे बघ आज गुलमोहर पुनः बहरला आहे आपल्या प्रेमाच्या आठवणी ही मनात दाटल्या आहेत ती सायंकाळची वेळ पुनः आली आहे आणि तुझ्या गप्पा ही रंगल्या आहेत वार्याची मंद झुळुक देह स्पर्श करते आहे तुझ्या केसातल्या गजरा ही दरवळतो आहे पक्ष्यांचि किलबिल ही एक मधुर संगीत देत आहे आणि तुझे ते निरागस हसु ही खुलत आहे सूर्य मावळतीला आला आहे तुही माझ्या मिठीत हळूच समावत आहेस तुझ्या बंद डोळ्यात स्वप्न कैद झाली आहेत घडाळ्यातलि वेळ ही अशीच थांबली आहे आज पुनः गुलमोहर तर बहरला आहे पण आज एकटा मी पडलो आहे एकटा मी पडलो आहे...... मनात फक्त आठवाणीच उरल्या आहेत कारण आज एकटा मी पडलो आहे एकटा मी पडलो आहे......

0 likes 0 shares
WhatsApp