आज संध्याकाळी फिरताना पाहिले मी एका जोडप्याला , वयाची पन्नाशी ओलांडली तरी अंत नव्हता त्यांच्या प्रेमाला , तळ्याच्या काठावर बसुनी मन मोकले करत होती , खर तर त्या गप्पांमधुनी एकमेकाना सावरत होती , आयुष्याच्या घालवलेल्या क्षणांना आठवून हसत होती , खर सांगू का… ती आजी अजुन ही आजोबांना बघून लाजत होती , आजीला पाहून आजोबांनी तिला मोगरयाचा गजरा भेट दिला , तळ्याच्या त्या काठावर बसून एक ice-cream चा कोन दोघांनी मिळून खाल्ला , प्रेमाच्या रंगात रंगताना आजीच्या डोळ्यातून पाणी आले , अन तिने आजोबांचा हात हाती घेवुन सात जन्माचे वचन पुन्हा मागितले , खर तर ती संध्याकाळ माझ्यासाठी अविस्मरनीय होती , प्रेमाचे अजुन एक रूप पाहण्याची मिळालेली अनमोल संधी होती …….
0 likes
0 shares