आजवर काही मागीतले नाही देवा पण आज एक वर हात जोडून मागतो एक दगडाचं मन दे हजार वार झाले या काळजावर जवळचीच सोडून गेली अनोळखी वळणावर नाती जशी तूच देतो त्यांना थोडचं आयुष्य दे हात जोडून मागतो देवा एक दगडाचं मन दे एकांताला आपलं मानतो आता मला कुणीच नको मी स्वत:चीच समजूत घालतो अन तिला त्रास नको पण तिन दिलं दु:ख मला तिला भरभरून सुख दे हात जोडून मागतो देवा एक दगडाच मन दे ती दूर आहे खूप माझ्या तरी का ही ओढ आहे सुखात असेल ती माझ्याविणा ही जाणीव गोड आहे तिच्या जीवनात आनंद आणी हवतर मला दु:ख दे हात जोडून मागतो देवा मला एक दगडाचं मन दे रे बाबा@@
0 likes
0 shares