Back to feed
S
Sahil Singh Love · Marathi · Romantic

आजही मला सर्वांच्या नकळत, तुला चोरून पहायला आवडतं. . आजही तुझ्याशी बोलण्यासाठी, मला कारणं शोधायलाआवडतं. . आजही तुझ्याशी तासन् तास, बोलत बसायला मला आवडतं. . अन् आजही तु बोलु लागलीस की, मला ऐकत बसायला आवडतं. . आजही कॉलेज व अभ्यासात, तुला विसरून जायला आवडतं. . नंतर मात्र एकांत अन् शांततेत , तुला पुन्हा पुन्हा आठवायला आवडतं. . आजही मला स्वप्नात तुला, एकटीला च पहायला आवडतं. . अन् स्वप्नातही अशक्य काम , तुझ्यासाठी शक्य करायला आवडतं. . आजही मला तुझ्या पुढील भेटीची , आतुरतेने वाट पहायला आवडतं. . अन् एवढे नकार स्वीकारूनही मला, पुन्हा तुझ्या प्रेमात पडायला आवडतं...

192 likes 81 shares
WhatsApp