आजही येतो प्रत्येक दिवस तुझी आठवन घेउन, आजही सरते प्रत्येक रात्र तुझी स्वप्न पांघरुन, कसं विसरु तुला? आजही आठवतेस तु, आजही श्रवतो कानी तुझ्या धुंद हाकेचा मारवा, आजही मोहवतो तनाला तुझ्या स्पर्शाचा गारवा, कसं विसरु तुला? आजही आठवतेस तु, आजही भिरभिरतो उन्हात तुझ्या प्रेमाचा पारवा आजही लुकलुकतो अंधारात तुझ्या मायेचा काजवा कसं विसरु तुला? आजही आठवतेस तु, आजही विरहाचा वैशाख पेटतो माझ्या मनात, तुझ्याच छायेचा गुलमोहर फुलतो माझ्या अंगनात, कसं विसरु तुला? आजही आठवतेस तु, आजही येते प्रत्येक कातरवेळ तुझी सावली घेउन आजही येतं प्रत्येक पाउल तुझी चाहुल घेउन, सांग कस विसरु तुला? कसं विसरु तुला? आजही आठवतेस तु..... 💜❤💜❤💜❤💜❤💙❤💙❤💙❤❤💙
150 likes
21 shares