आजही_मी_फक्त_तुझीच_आहे आज दोन वर्षानंतर मी तुझा प्रोफाइल बघतेय, मी एवढ्या दिवसात तुझं तोंड पण बघितलं नव्हतं आणि तुझी कधी विचारपूस पण केली नव्हती. पण आज परत मला स्वतःला त्रास करून घ्यायचा होता म्हणून तुला बघायचा विचार मनात आला. तू सोडून जाण्याच्या अगोदर ज्या दिवशी तू माझ्या घरी आला होता. मी त्याचवेळी तुझा चोरून एक फोटो काढला होता आणि तुला पाठवला होता. तोच तू डीपी आता ठेवला आहेस. हा तोच फोटो आहे ज्यात तू बोलला होतास हा दिवस आणि हे क्षण कधीच विसरायचं नाही. त्या फोटोला बघून आज पुन्हा तेच वाटलं की तुझ्या मनात आज पण माझ्या बद्दलं काही आहे. जाऊदे मला विचार नाही करायचा आहे की तू फोटो का ठेवला आहेस आणि माझ्यात हिम्मत पण नाही की तुला Sms करून विचारू, तू तेव्हा नाही समजला तर आता सांगून पण काय उपयोग आणि समजल तरी का समजावू तुला, खर सांगू तर तू गेल्या पासून काही समजवण्याचा विचारही केला नाही. तू टाकलेल्या तुझ्या आणि तुझ्या प्रेयसीचा फोटो त्यात तू खूप आनंदी दिसत होता. तुझ्या नवीन प्रेयसीबरोबर तू इतका आनंदी होशील असं मला कधीचं वाटलं नव्हतं. विचार करते कधी कधी एक वेळ होती जेव्हा तुझा पूर्णवेळ फक्त माझ्यासाठी होता. आणि आज अशी वेळ आली आहे की तुझ्याकडे माझ्यासाठी एक मिनिट पण नाही आहे. हाच विचार करून तुला कधी Sms केला नाही. जसं आयुष्य चाललं आहे तसचं चालू दे. दोन वर्ष तुझ्याशिवाय राहिली, पण आयुष्य संपेपर्यंत तुझ्यावर प्रेम करेन.. कदाचित तुझ्या हृदयात माझ्यासाठी जागा नाही राहिली. एक वेळ होती जेव्हा फक्त आणि फक्त मीच तुझ्या हृदयात होती आणि आज सगळे आहेत तुझ्या हृदयात शिवाय माझ्या...
0 likes
0 shares