Back to feed
N
Nisha Verma Love · Marathi · Romantic

आठवण तुझी येताना मी स्वःतालाच विसरून जाते माहीत नाही का पण स्वःताशीच हसू लागते आठवण तुझी येताना तू हवाहवासा वाटू लागतो माहीत नाही का पण तू जवळ असावास असे वाटू लागते आठवण तुझी येताना तुझ्याशी खूप बोलावसं वाटत माहित नाही का पण शब्दच फुटत नाही आठवण तुझी येताना खूप बोलण्याची इच्छा होते माहीत नाही का पण बोलणे तसेच राहून जाते आठवण तुझी येताना जग अनोळखी होते माहीत नाही का पण समोर तूच दिसू लागतो.

0 likes 0 shares
WhatsApp