Back to feed
A
Arjun Mehta Love · Marathi · Romantic

आठवतं तुला त्या भेटीत रिमझिम सरींनी छेडलं होतं . भर दुपारी मला जणू चांदण्याने वेढलं होतं . आठवतं तुला त्या भेटीत श्रावण धुंद बहरला होता . ओल्या ऋतूत ओल्या स्पर्शाने ओला देह शहारला होता . आठवतं तुला त्या भेटीत दोघे व्याकुळ झालो होतो . तुझा गंध वेचता वेचता मीही बकुळ झालो होतो . आठवतं तुला त्या भेटीत भावनांनी कविता रचली होती . माझ्या डोळ्यात तू अन तुझ्या डोळ्यात मी वाचली होती. आठवतं तुला त्या भेटीत आणखी काय घडलं होतं ? मला स्मरत नाही पुढचं बहुतेक तेव्हाच स्वप्न मोडलं होतं

135 likes 8 shares
WhatsApp