Back to feed
N
Nisha Nair Love · Marathi · Romantic

*आत्या_नावाचे_सुख* आत्या बरोबरचं नातं खरंच खूप छान असतं . हे नातं भावनिक पातळीवर खूप आनंद देणारं असतं. आत्या भरभरून प्रेम देते... आपल्या जन्माआधीच, म्हणजे अगदी आपण आईच्या पोटात असतानाच आत्या ची आपली एक वेगळीच अदृश्य नाळ जोडलेली असते... आपल्या जन्माने तिला झालेला आनंद अवर्णनीय असतो. खरच *आत्या* नेमकी कोण असते हो ??? आई नसताना तुमच्यासाठी तुमची हक्काची माया देणारी , आत्या... ही तुमची प्रेमळ हाक ऐकताच तुम्हाला भरभरून प्रेम देणारी... आपल्या आवडीचं , लपवून ठेवलेलं *चायनीज* खाऊ घालणारी... आपल्या लहानपणाची साक्षीदार , आपल्या लहानपणीच्या आठवणी तिच्याशिवाय पूर्ण होत नाहीत... तिचं वाढणारं वय आणि त्यामुळे वाढणार्‍या जबाबदार्‍या आपल्याला तिच्यापासून दूर करतात , पण ते तुम्हाला आवडलेलं नसतं , तुमच्याही नकळत... "तू अगदी तुझ्या आत्या वर गेलायेस"... असं कोणी म्हटलं तर एक वेगळंच स्मित हसू आपल्या चेहर्‍यावर उमटतं... अगदी आजही आत्या साठी आपण कोण असतो ??? आपल्या जन्मापूर्वी पर्यंत तिला कदाचित लहान मुलं अजिबात आवडत नसावीत...!!! पण , तरीही तुम्हाला पहिल्यावर तिच्या पोटात मायेचे झरे लोटतातच कसे ??? का कुणास ठाऊक...!!! आपल्या लहानपणी तुमची केअरटेकर , तुमच्या आईची हक्काची असिस्टंट अशा जबाबदार्‍या तिने यथार्थ पार पाडलेल्या असतात... आपल्यासाठी एखादं म्हणून गिफ्ट घ्यायला ती जाते ... आणि प्रत्यक्षात ... जे जे आवडेल ते ते तुमच्यासाठी ती घेऊन येते , अगदी सहज... तुमची आवडनिवड मनापासून जपते अन् दर वाढदिवसाला काहीतरी तुमच्यासाठी स्पेशल गिफ्ट देते... सर्वात महत्वाचं म्हणजे... तुमच्याप्रती तिची माया आटतंच नाही, तिचे मुलं झाल्यावरही... आईएवढेच तुमचे लाड करणारी , कशाचीही अपेक्षा न ठेवणारी , तुमच्या बाबा न ची ती सावली असते... 😍😘 Dedicated to all Aatyaaas 😊

52 likes 19 shares
WhatsApp