आपल्या आयुष्यात चोरपावलांनी .., कोठुन येते ती व्यक्ति अचानक ... कशी व का भेटते ती आपल्याला ..? एक अनोळखी वळण .., जिथे आपल्या पावलांना मिळते .., दुसऱ्या दोन पावलांची साथ ... आणि सुरु होतो ... एक मर्यादित प्रवास ... जिथुन जगणंही नव्याने सुरु होतं .., प्रत्येक भावनेला अर्थ .., हाकेला साद .., व दुःखाला ... सांत्वन मिळतं ... काट्यांवरुन चालतांना देखिल .., फुलांच्या संवेदना जाणवतात ... " त्या " व्यक्तिच्या केवळ स्मरणाने .., हृदयाची स्पंदनं वाढतात ... त्या व्यक्तिचा स्पर्शदेखिल ... पहाटेच्या गारव्या इतका धुंद वाटतो कदाचित अनोळखी ओळख असते ही .., कितीही नाही म्हटलं तरी हवी - हवीशी वाटणारी ... !!!
0 likes
0 shares