Back to feed
K
Kiara Chauhan Heartbreak · Marathi · Heartbreak

आंबा 1) ‘फळांचा राजा आंबा’ याची गोडी चाखायला खवय्ये नेहमीच आतुर असतात. टेस्ट प्रमाणेच आंबा त्याच्या गुणांमध्येही बेस्ट आहे. आंबा शरीरासाठी आरोग्यदायी असा आहे. हे फळ शक्तिवर्धक आहे. आरोग्याशी निगडीत समस्यांवर आंबा हा रामबाण उपाय आहे 2) अन्नाबद्दल रूचि उत्पन्न करणे आणि भूक वाढविणे हे आंब्याचे प्रमुख गुण आहेत. शरीराची आग होत असल्यास आंबा उपयुक्त ठरतो. यामुळेच उन्हाळ्यात आंबा खाणे योग्य आहे. 3) अतिसार म्हणजे वारंवार शौचास होणे. या व्याधीवर आंब्याची साल व कोय उपयुक्त आहे. साल ठेवून तिचा काढा तयार केला जातो. तसेच कोय भाजून तिचे चूर्ण करून मधातून दिल्यास विशेषतः लहान मुलांचा अतिसर दूर होतो. 4) आंब्याच्या मोसमात आम्ररसावर ताव मारणार, त्यामुळे काहींचे पोट बिघडते. यावरचा उत्तम गुणकारी उपाय आंब्याच्या कोयीतच ठेवला आहे. कोयीतील गर चावून खाल्ल्यावर लगेचच अजीर्णपणा, पोटदुखी, वारंवार होणारी मलप्रवृत्ती थांबते. आमांश आणि जुलाब यावर हा रामबाण उपाय आहे. 5) काही व्यक्तींना गाडीतून, बसमधून किंवा रेल्वेतून प्रवास करताना उलटी होते. अशा व्यक्तींनी प्रवास करताना आंब्याची पाने चघळावीत. यामुळे उलटीचा त्रास होणार नाही. 6) केसांच्या समस्येवर माका, ब्राह्मी, कोरफड, वडाच्या पारंब्या, जास्वंद, आवळा अशा अनेक वनस्पतींप्रमाणेच आंबाही उपयुक्त आहे. केसात कोंडा झाल्यास अथवा सारखे खाजत असल्यास आंब्याचा मोहोर, खोबरेल तेल आणि थोडे पाणी उकळून तेल सिद्ध करावे. या तेलाचा वापर केल्यास निश्चितच फायदा होईल. 7) दातांच्या समस्यांवर ही आंबा गुणकारी आहे. आंब्याच्या झाडाची आंतरसाल चघळल्यास दात बळकट होतात. आंब्याची पाने सकाळी चघळल्यास हिरडय़ा मजबूत होतात. दातातून रक्त येणे थांबते. 8) डोळ्यांशी निगडीत समस्यांवरही आंबा उपयुक्त आहे. आंब्याची ताजी पाने चार कप पाण्यात उकळावीत. ते पाणी आटवून एक कप करावे. स्वच्छ फिल्टर पेपरने गाळावे. गार झाल्यावर बाटलीत भरावे. असे पाणी नेत्रबिंदू (ड्रॉप्स) म्हणून वापरावे. डोळ्यांना सूज येणे, डोळ्यांतून वारंवार पाणी येणे, धूसर दिसणे, वाचनामुळे डोळे थकणे, रांजणवाडी या विकारांवर या थेंबांमुळे आराम मिळतो. 9) विंचू, झुरळ, मुंग्या, डांस अशा कीटकांच्या चावण्यामुळे त्वचाविकार होतात. अशा वेळेस आंब्याचा मोहर किंवा ताजी कोवळी पाने स्वच्छ धुऊन लगेचच वाटून त्याचा लेप लावावा. काही तासांतच आराम मिळतो. 10) पोटातील कृमींवर आंब्याच्या कोयींचे चूर्ण जालीम औषध आहे. मुरगळणे, लचकणे, सूज येणे या समस्यांवर आंब्याच्या कोयीचे चूर्ण दाट लेप करून लावावे.

33 likes 21 shares
WhatsApp