आयुष्याच्या सुपात, अनंत दुःखे पाखडतांना... वेचल्या मी तुझ्या आठवणी...अलगद, आणि ठेवल्या सुखाच्या कोठारात..कायमच्या...! हृदयरूपी पाषाणाला, फुटलाय आज पाझर तुझ्या आठवणींचा... ज्यातून अविरत वाहायचा, माझ्या निःस्वार्थ प्रेमाचा झरा...कधिकाळी...! तुझ्या नसण्याच्या जाणिवांची खात्री होताच बरसू लागल्या आसवांच्या श्रावणधारा... आणि, भिजलाय माझा अंगप्रत्यंग, आषाढाच्या ओल्या रात्रिसारखा...ऐन वैशाखात...! का अचानक तू पूर्णपणे अलिप्त झालीस आयुष्यातून..अमावस्येच्या चंद्रासारखी..? आणि ठेवल्यास अगणित चांदण्या, फक्त आणि फक्त....आठवणींच्या...
0 likes
0 shares