आवडेल मलाही पाऊस व्हायला … न सांगता तुझ्या भेटीला यायला … धुंद होऊन तुझ्यावर बरसायला … केसांमधून पाठीवर हळुवार ओघळायला … अंगावरच्या काट्यांची वाट तुडवायला … आवडेल मलाही पाऊस व्हायला … आवडेल मलाही पाऊस व्हायला … गंध होऊनी श्वासात तुझ्या मिसळायला … श्वासातल्या उबेत मनसोक्त डुंबायला … काळ्या ढगांमधून पळून यायला … अलगद तुझ्या कुशीत शिरायला … आवडेल मलाही पाऊस व्हायला … आवडेल मलाही पाऊस व्हायला … नकळत हृदयात तुझ्या शिरायला … हृदयात मेणाचं एक खोपडं बांधायला .. तुझ्या स्वप्नात येऊन तुला जागवायला .. काळजाचा तुझ्या वेध घ्यायला … आवडेल मलाही पाऊस व्हायला … आवडेल मलाही पाऊस व्हायला … हातात हात घालून तुझ्या रानोमाळ हिंडायला … पंखात तुला घेऊन भरारी घ्यायला … आठवण बनून तुझ्या डोळ्यात उतरायला … अश्रूंमध्ये आनंदाची साखर मिसळायला … आवडेल मलाही पाऊस व्हायला … आवडेल मलाही पाऊस व्हायला … एकट्या मनाची सोबत करायला … कोणाच्यातरी चेहऱ्यावरचं हसू व्हायला … भाळशील का तू माझ्या या रुपाला सांग ना जमेल का तुला साथ द्यायला … तरच आवडेल मला पाऊस व्हायला …
0 likes
0 shares