Back to feed
A
Asha Iyer Heartbreak · Marathi · Heartbreak

आहे लयच विचारी गरीब आमचा शेतकरी । परी खोदुन आहे मोठी दरी त्याच्या वाटेवरी । वरषानु वरषे चालली असिच त्याची वारी । चोरायचाच गराडा आहे सभोवताल त्याच्या दारी । संकटानी घेरले त्यास पहा दिशा चारी । नाही निसर्गाचा साथ व्यापारीही झाले भारी । पडतो पोटाला पिळा उघडी नागडी मुलं घरी । कधी येशील रे धाउन सांग तु देवा हरी । कधी होतिल का जागे लोकं हे सरकारी । तुटेल नाही तर एक दिस करा कोनितं काहितरी । आसवं डोळ्यात थबकले एकेक दिवस जातो भारी ।

70 likes 30 shares
WhatsApp