❤ इच्छामरण..(एक विलक्षण प्रेमकहाणी). ❤ मयंक तुझ्यावर आरोप आहे कि,राधाचा तु स्वतःच्या हातांनी खुन केलास,काय तु तुझी बाजु स्पष्टपणे मांडु शकतोस... हो जजसाहेब नक्कीच मांडतो,पण त्यासाठी मला सुरुवातीपासुन सर्व हकीकत सांगायला हवी.. (न्यायाधीश)परवानगी आहे.. धन्यवाद जजसाहेब... राधा माझ्या कंपनीत जॉब करायची बेँगलोरला,ती मुळची पुण्याची आणि मी बेँगलोरचा,आणि तिथेच आमचं प्रेम जमलं होतं... तिचे आईवडील एका अपघातात गेले याचा तिला जबर धक्का बसला,.तिची मनस्थिती प्रचंड बिघडली आणि त्यातच तिला पॅरालिसीसचा अटॅक आला आणि तिचे हातपाय लुळे पडले... तिची काळजी घेण्यासाठी मी कंपनी director body कडे सोपवली आणि तिला माझ्या घरी घेऊन आलो.. माझ्या निर्णयाचं तिला प्रचंड नवल वाटलं,पण तिला सर्व सुखसोयी,आनंद देण्याचा निर्धार मी केला,वैयक्तिकरित्या मी तिची देखभाल करु लागलो कशाही प्रकारची कमतरता तिला मी भासु देत नव्हतो,चोवीस तास मी तिच्यासोबत असायचो... तिची प्रत्येक लहान सहान कामे मीच करु लागलो,मी एका कंपनीचा मालक नव्हे तर आता एक असाह्य प्रेयसीचा एक असा प्रियकर होतो जो तिला एक सुंदर आयुष्य देऊ शकेन... तिला कधी तिच्या असाह्यतेची जाणीव होऊ द्यायचो नाही मी,पण जेव्हा जेव्हा तिचे केस मी विँचरायचो,तिचा make up मी करायचो तेव्हा तेव्हा तिला तिच्या असाह्यतेची जाणीव व्हायची,तिला भरवण्यासाठी मी हात पुढे करायचो तेव्हा,रोज तिला बेडवरुन उचलुन व्हीलचेअरवर ठेवायचो तेव्हा,आणि चेहर्यावर पडत असलेल्या पावसाची संततधार पुसण्याची जेव्हा तिला माझी गरज पडायची तेव्हा,तिला स्वतःच्याच अवस्थेवर किव यायची,तिच्या डोळ्यात पाणी यायचं... तिच्या चेहर्यावर घोंगावणार्या माशी समोरसुद्धा जेव्हा तिला संघर्ष करावा लागायचा तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी यायचं आणि ते अश्रु पाहीलं की मी हेलावुन जायचो,तिला नकळत मी देखील रडायचो.... एक दिवस राधा मला म्हणाली,माझ्यावर किती प्रेम करतोस,मी म्हणालो प्रचंड,मग ऐक मी काय सांगते ते,अशा अवस्थेत माझा जीव गुदमरतोय रे,क्षणोक्षणीचं माझं परावलंबित्व माझं खच्चीकरण करतंय,माझी छोट्यातल्या छोट्या गोष्टी करण्याप्रती असमर्थता मला जगु देत नाहीये... रात्रीचा चेहर्याला झोँबणारा थंडगार वारा जेव्हा मला नकोसा असतो तेव्हा चेहरा झाकण्यासाठीसुद् धा मला तुला आवाज द्यावा लागतो.... माझी अवस्था पाण्यातुन काढलेल्या माशासारखी झालीय जी धड जगतही नाही आणि मरतही नाही,मी तुला अंतकरणापासुन विनंती करते,मला मरण हवंय.... "मला मरण हवंय..मला मरण हवंय...." असं म्हणुन ती रडु लागली,तेव्हा माझी हिँमत ढळली आणि माझा कंठ दाठुन आला,प्रेमाने तिचा हात मी हातात घेतला पण त्या स्पर्शातलं प्रेम समजण्याइतके प्राण तिच्या हातातच नव्हतं.... मी तिची इच्छा मान्य केली आणि तिच्या इच्छेनुसार इच्छामरणासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला... खटला चालु झाला होता,बातमी मिडीयापर्यँत पोहोचली,सर्वजण तिच्या या इच्छेला एक मुर्ख मागणी म्हणुन आपापल्या चॅनेल्सवर दाखवु लागले,हा मुद्दा तेव्हाच थांबला जेव्हा राधाने मिडीयाला एकच प्रश्न विचारला,तुमच्या पैकी कोणीही माझं आयुष्य फक्त अर्धा तास जगुन दाखवा,मी माझी मागणी तत्काळ मागे घेईन.... कोणीही तिच्या या वक्तव्यावर पुढे सरसावले नाही आणि या बातम्या यायच्या थांबल्या,पण खटला पुढे चालला आणि एक दिवस न्यायालयाचा निकाल आला कि इच्छामरणासारख्या कोणत्याही प्रकारच्या कायद्याची आपल्या संविधानात तरतुद नसल्या कारणाने ही मागणी हे न्यायालय फेटाळुन लावत आहे.... आभाळ कोसळलं,होत्या नव्हत्या त्या आशां हवेत विरुन गेल्या,राधा आणि मी या निकालाने पुर्णतः हादरुन गेलो..... यानंतर राधा माझ्याकडे पुन्हापुन्हा मृत्युची मागणी करु लागली,मग एक दिवस मीच तिला तिच्या इच्छेनुसार ketamine या इंजेक्शनचा overdose देऊन दाठल्या मनाने मुत्युदान दिलं,ketamine ने कसलाही प्रकारचा त्रास होत नाही त्या इंजेक्शनचा overdose घेतल्यावर माणसाला झोप येते पण त्यातुन तो कधीच उठत नाही... काय चुकलं माझं हेच की मी प्रेयसीच्या सुखाचा विचार केला... जजसाहेब मी खरंच मारलं तिला पण ते तिच्या आनंदासाठी... मी तुम्हाला हे सगळं याच्यासाठी नाही सांगत आहे की तुम्ही मला सोडावं... मला तुम्ही फाशी द्यावी ही एकच विनंती आहे तुम्हाला.... सर्व बाजु ऐकुन घेतल्यावर एक ऐतिहासिक निर्णय देण्यात आला..... मयंकला फक्त आणि फक्त सहा महीन्याची कोठडी देऊन सोडण्यात आलं.... पण दुसर्याच दिवशी बातमी हाती आली की जिथे राधाचा मृत्यु झाला होता तिथेच मयंकही मृत अवस्थेत मिळाला,त्याने आत्महत्या केली होती.. शेवटी त्याने न्याय केला होता आपल्या प्रेयसीच्या सुखाशीदेखील आणि स्वतःच्या प्रेमाशी देखील ....... !
0 likes
0 shares