इवलंसं रोपटं मी🌱 तू म्हणालास तर मरून जाईन ओंजळभर 🥛पाणी दे मला आयुष्यभर तुझ्या कामा येईन दिलं जीवदान मला तर तुला जगायला प्राण वायू देईन जगवलंस मला तर तुझ्या देवांसाठी 🌷फुलं देईन फुलवलंस मला तर तुझ्या मुलांसाठी 🍑फळं देईन तळपत्या उन्हामध्ये तुझ्या कुटुंबाला 🌳सावली देईन तुझ्या सानुल्यांना खेळावया माझ्या खांद्यावर झोका देईन तुझ्या आवडत्या🦋 पाखरांना मायेचा मी खोपा देईन कधी पडला आजारी तर तुझ्या औषधाला 💊कामा येईन झालो बेईमान जरी मी शेवटी तुझ्या सरणाला कामा येईन .... 🌱 ...एक रोपटं
236 likes
37 shares