Back to feed
N
Navya Chauhan Love · Marathi · Romantic

उचकी ची वाट पाहीन मी ……. चल आज सांगतो तुला थोडा मनातल.....मस्त होतीस तू एकदम मस्ततततत……….खूप आवडयचीस मला….खूप म्हणजे खूप ….. किती हे विचारू नकोस …. कारण किती प्रेम आहे हा प्रश्न म्हणजे…..पाण्या ची चव काय आहे असे विचारण्या सारखे आहे . तू माझ्या जवळ असताना कधी इतके सांगितले नसेन मी तुला पण मस्त दिसायचीस तू …. तुझे हसणे न …….काय सांगू ….मस्त…… एकदम जीवघेन होतं. तुझे डोळे…..वाह….त्यांचे तर काय बोलायलाच नको….. तुझे ते छोटे छोटे डोळे ……. खरे सांगायचे तर….तुझ्यापेक्षा तुझ्या डोळ्यांवरच मन बसलेले माझे तुला खूप वेळा बोललेलो मी,तुला आठवतंय का ते माहित नाही आता,कारण दूर केलेल्या माणसाचे कोणी काही लक्षात ठेवत नाही न ….म्हणून कदाचित आठवणार नाही तुला ………. मी म्हणायचो तुला “हे तुझे डोळे आहेत न….मस्त आहेत….सांभाळ त्यांना…..तुझे नाहीयेय्त.माझे आहेत ते …..” किनाऱ्यावर बसल्यावर खांद्यावर डोके ठेवायचीस न तेव्हा…..काय सांगू ? सगळा विसरायला व्हायचा ,बाकिंच्यान कडे बघून मनातल्या मनात सांगावसं वाटायचं कि,”बघा मी किती सुखी आहे ते…..” पण माझ्या मनातलं ऐकलं वाटतं कोणीतरी,नजर लागली कोणाची तरी आता कशीशी वागलीस तरी एक खरे आहे,खोटे सांगणार नाही….जितके दिवस पण सोबत होतीस न…..त्यातल्या प्रत्तेक क्षणात खूप सुख दिलायस मला …….इतके सुख कि,त्या सुखाची सवय झालेली मला. इतर सगळ्यान पेक्षा मला महत्व दिलंयस ….. आपली काळजी घेणारं असं कोणतरी आपल्या आयुष्यात असलं कि किती मस्त वाटतं ना? मनातली प्रत्तेक गोष्ट सांगायचीस मला,आज आई ओरडली,वाईट वाटलं,हि अशी वागली,आज हिचा राग आला,हि मैत्रीण असे म्हणाली, आणि……………..खूप काही रडायला आलेच कधी तर……तुला रडताना सर्वात पहिल्यांदा माझी आठवण यायची ……… मला इतका महत्व दिलस त्याबद्दल खरच खूप खूप thanx ……. मला जर कोण काही वाईट बोलले,किंवा कोणी चिडवले तर माझ्यापेक्षा जास्त राग तुला यायचा…..माझ्यासाठी अक्या जगाबरोबर भांडायला तयार होतीस तू …..हे बघितले न कि बरे वाटायचे.वाटायचे कि,”चला कोणतरी आहे आपल्या बरोबर …..जे आयुष्य भर साथ देईल माझी.माझ्या प्रत्तेक क्षणी साथ असेल माझ्या…….” तुझी चूक नाहीयेय ग,बहुतेक तू इतकी सवय लावलेलीस न तुझी आणि तुझ्या प्रेमाची कि आता तू नाहीस म्हणून जरा त्रास होतोय. भेटायला आलीस न कि,मी लपून लपून तुला पाहायचो …..काय मस्त दिसायचीस तू?वाह …. वार्याने कडी तुझी ओढणी याची माझ्या चेहऱ्यावर..........काय सांगू काय वाटायचे ते? आणि मी लपून बघताना चुकून नजरा नजर झालीच ….तर काय सुंदर लाजायचीस …… एक request आहे …..अशी लाजत नको जाउस ग…… कोणाचा तरी जीव घेईल तुजे लाजणे ….. काही काही चेहरे असतात माझ्या सारखे जे हसले तरी सुंदर वाटत नाही,आणि काही चेहरे असतात तुझ्या सारखे जे आळस देताना पण सुंदर दिसतात …. तुझ्या गालावर खळी नव्हती … पण गालात खळी पडत नसली तरी पण मुलगी सुंदर दिसू शकते…हे तू दाखवून दिलेस… तू म्हणालेलीस मला एकदा आठवत का कि,”म्हणजे मीच स्वताला दूर करायचे का तुझ्यापासून ?” वाक्य आवडलेले मला…..आणि तुला म्हटलेले मी कि,dairy मध्ये लिहून ठेवेन मी हे वाक्य …. आता diary तले तेच वाक्य ऐकून diary ओली होते मग तिची पानं पुन्हा सुकवतो आणि ठेवून देतो असो पण तू दिलेल्या प्रत्तेक सुखासाठी खरच मना पासून thanx…… तू नाही राहू शकत ना माझ्या बरोबर सुखी ….???? तर जा बाई तू जा? त्यातच सुख असेल ना तर खरच जा.... तुझे सुख महत्वाचे आहे ग माझ्यासाठी …….आणि नेहमी राहील सुखात रहा…..आनंदात रहा..... मी काही दुख दिले असेल तर त्याबद्दल माफ कर मला……… कधीतरी तू माझी आठवण काढलीस म्हणून मला लागलेल्या उचकी ची वाट पाहीन मी...

0 likes 0 shares
WhatsApp