Back to feed
A
Avni Singh Spiritual · Marathi · Spiritual

*उद्योगाचे कानमंत्र :* 1) कुणीही मनुष्य *जन्मतः बिझनेसमन* नसतो. ते कौशल्य अनुभवाने मिळवता येते. 2) व्यवसायासाठी *राग* हा दुर्गुण आहे, पण *ईर्ष्यायुक्त आकांक्षा* हा गुण ठरतो. 3) कोणताही व्यवसाय *तीन वर्षांनंतर* बाळसे धरतो. तितके *थांबण्याचा* संयम हवा. 4) व्यवसाय नफा *कमावण्यासाठीच* करा, मात्र सुबत्ता आल्यावर समाजाला *विसरु* नका. 5) *प्रतिष्ठा* माणसाला नसून *पैशाला* आहे. पैशाचे आणि गुंतवणुकीचे *महत्त्व* ओळखा. 6) व्यवसाय करण्यासाठी *विशिष्ट शिक्षण* गरजेचे नसते. नोटा *मोजायला* येणे पुरेसे ठरते. 7) ग्राहक *देव* असतो आणि तो कोणत्याही *धर्माचा, भाषेचा असल्याने* सर्व भाषा व धर्मांचा आदर करा. 8) *‘दिमाग मेरा पैसा तेरा,’* हे सूत्र लक्षात ठेवा. *व्यवसाय हा स्वतःच्या बुद्धिमत्तेने, पण बँकांकडून कर्ज घेऊन करा.* मात्र *कर्जफेड* काटेकोर व नियमितपणे करा. 9) व्यवसायात कोणतेही काम *लहान अथवा हलके* मानू नका. कष्टाची तयारी ठेवा. 10) संधींवर लक्ष ठेवा. *‘मोका देखके चौका मारनेका,’* हे तत्त्व पाळा. 11) एक व्यवसाय *न* जमल्यास दुसरा करा, परंतु *उद्योग क्षेत्रातून* काढता पाय घेऊ नका. 12) *भरपूर पैसा मिळवा. तो साचवून ठेऊ नका. कुटूंबासहित पैसा एन्जॉय करा आणि गरजूंना मदतही करा.* 13) पैशाचा पाठलाग करत *आरोग्याचा बळी* देऊ नका. व्यसने, चैनबाजी, दिखावा यापासून दूर राहा. 14) शुद्धता, नम्रपणा, प्रामाणिकपणा आणि आई-वडिलांचे *संस्कार* धंद्यात यशाला कारणीभूत ठरतात. 15) व्यवसायात *समस्या* येतातच, परंतु त्यातील *९५ टक्के समस्या संयमाने शांत राहून* सोडवायच्या असतात. 🍁 🍁🙏🙏

210 likes 21 shares
WhatsApp