Back to feed
A
Arjun Sharma Spiritual · Marathi · Spiritual

उंदीर जर दगडाचा असला तर देवाच्या पाया जवळ ठेवून सगळे त्याची पूजा करतात. पण तोच जीवंत उंदिर समोर आला तर त्याला मारल्या शिवाय चैन पडत नाही. साप जर दगडाचा असेल तर त्याची देवाच्या डोक्यावर बसवून पुजा करतात. दुधाचा अभिषेक करतात. पण जीवंत साप समोर आल्याबरोबर तडकाफडकी त्याला ठेचून मारले जाते. स्त्री जर दगडाची असेल तर आई स्वरूप मानून तिचे कडक उपवासाने पूजन केले जाते. पण जीवंत स्त्री समोर आल्यावर तीचा विनयभंग, बलात्कार, हुंडाबळी नाना प्रकारे बळी घेतला जातो. जीवंतपणाचा इतका तिरस्कार का केला जातो. धर्म सांगतो का?जिवंतापेक्षा दगडावरच जास्त प्रेम करा. त्यामुळंच की काय आता लोकांची मनंही दगडासारखी होत चालली आहेत. 🤔🤔 कडु आहे पण सत्य आहे ना.. *सत्यमेव जयते!*

196 likes 67 shares
WhatsApp