Back to feed
N
Nikhil Chauhan Love · Marathi · Romantic

एक GF हवी आहे... साधी दिसणारी... काळ्या केसांची... घार्या डोळ्यांची... जास्त प्रश्न न विचारणारी... माझ्यावर जीवापाड प्रेम करणारी... अशी उदार अंतःकरणाची... . " बाहेरचं खायला आवडत नाही मला..." असं बोलणारी... साधीच पण जीन्स घालणारी... पुस्तकांवरही प्रेम असणारी... . . . माझ्या काहीच्या काही कविता फालतू असल्या तरी... " खरचं किती सुंदर कविता आहेत तुझ्या, जणू काही दुसरा मर्ढेकरच..." असं खोटं खोटं बोलणारी... . . . पावसात भिजायला आवडणारी.... " हिंदी चित्रपट आवडत नाही मला मराठीच आवडतात. आणि तेही मी घरीच बघते.." असं म्हणणारी... . . . वाढदिवसाच्या आदल्या दिवशीच " प्लीज मला काही गिफ्ट घेवू नकोस..." असं म्हणणारी... आणि... ब्रेकअपच्या वेळी... " प्लीज मला समजून घे, माझ्यापुढे दुसरा पर्याय नाही..." हे इतक्या सच्चाईने बोलणारी, कि ते ऐकूनच पुन्हा तिच्या प्रेमात पडावं असं वाटायला लावणारी... . . . दिसायला परीसारखी नसली तरी चालेल पण मनाने खरी असणारी... हवी आहे अशीच कुणीतरी... मला आयुष्यभर साथ देणारी...💖💖

0 likes 0 shares
WhatsApp