Back to feed
V
Vihaan Malhotra Love · Marathi · Romantic

एक खुप सुंदर मुलगी असते पण दुर्देवाने ती आंधळी असते. संपुर्ण गावात तिला कधी कुणी प्रपोज केला नसतो. तिला खुप वाटायचे की मी पण हे जग पाहावे, माझ्यावरही कुणी प्रेम करावे. ऐकेदिवशी ऐक मुलगा शहरातुन येतो, आणि तिला पाहाताच त्याला ती पसंत येते. आणि हिंमत करुन तो तिला प्रपोज करतो, ती मुलगी त्याला म्हणते तुला माहित आहे मी अंध आहे.. मुलगा म्हणतो हो माहीत आहे. मुलगी म्हणते वा दोस्त तुला माहित असुन तु मला प्रपोज केलास.. तु मला ऐक तुझा फोटो दे आणि त्यामागे तुझा नाव आणि नंबर लिख. जिवनात कधी मला डोळे मिळतील तर सर्वात पहिले तुझा चेहरा पाहिन.. तो मुलगा तिला फोटो देऊन निघून जातो. काही दिवसांनी तिला डोळे मिळतात आणि ती त्याचा फोटो पाहते तर तो मुलगा तिला तो मुलगा आवडत नाही, ती स्वतःचा चेहरा बघते तर खूप सुंदर असते आमच्या दोघांची जोडी कशी जमेल.. ती त्याला फोन करुन सांगते दोस्त तु मला प्रपोज केला त्याबदल आभार तु मला विसरुन जा आणि दुसरी मुलगी बघ.. काही दिवसांनी मुलगा ऐक पत्र पाठवतो आणि त्यात लिहिलेले असते की... मी तुला विसरुन जाईल, तु फक्त माझ्या डोळ्यांची काळजी घे...

0 likes 0 shares
WhatsApp