Back to feed
D
Diya Malhotra Love · Marathi · Romantic

एक गोड कविता : पंढरपुरात मंदिरात एकटी उभी रखुमाई पाहून... मी फोनच लावला त्या सावळ्या विठूला न राहवून... असा रे कसा तू विठू तुझ्या बायकोशी वागतोस... तिला एकटीला सोडून का बाजूच्या मंदिरात उभा रहातोस...? फोनवर तिकडून बोलताना विठूने मला सुंदर उत्तर दिले, त्याचे गोड शब्द कानी ऐकताच माझे भानच हरपले... "रोज भेटायला येऊन गर्दी करता ना तुम्ही सारे पाहुणे... माझ्या सोबत उभी राहून कठीण होईल तिला आराम मिळणे..." "शेजारच्या मंदिरात उभी राहून ती मला चोरून चोरून पाहते... तिचे ते प्रेमळ पाहणे मला फार फार भावते..." "नाजूकशी रखुमाई लाडकी आहे ना ह्या श्रीहरीची.... म्हणून काळजी घेत असतो मी माझ्या परीची...!!! असं प्रेम हवं...नाही का...?

232 likes 19 shares
WhatsApp