Back to feed
A
Ayaan Deshmukh Spiritual · Marathi · Spiritual

*-----एक छान कविता-----* *एकटे राहणे जमलेच नाही* *माणसांना टाळणे जमलेच नाही*. *कष्टाची भाकरी गोड लागली* *लुटावे कुणाला कधी जमलेच नाही* . *चेहरा आरशासारखा स्वच्छ होता* *मुखवटा लावणे जमलेच नाही* . *जे लाभले ते आनंदाने स्वीकारले* *कष्ट नाकारणे जमलेच नाही* . *जिंदगी साधी सरळ होती* *भूल थापा मारणे जमलेच नाही* . *हरघडी माणसांची पूजा बांधली* *सतत देवळात जाणे जमलेच नाही* . 💐*शुभरात्री*💐

124 likes 53 shares
WhatsApp