Back to feed
A
Arjun Rao Love · Marathi · Romantic

(एक जोडपे बसलेले असते , त्याच्या प्रियसिच लग्न ठरलेल असते ) ती :- तू आता पहिल्यासारखा का राहिला नाहीस तो :- कसा असणार ? आता तुझी साथ जी सोबतीला नाही ... ती :- आता परत कोणाच्या नजरेत गुंतशील का ? तो :- आता गुंतायला तशी पाणीदार नजर सापडणार नाही.. . ती :- इतके कशाला प्रेम केलेस रे माझ्यावर ? तो :- जीव तू माझा , अन स्वताचा जीव कोणाला प्रिय नाही ... ती :- तूच सांग मी काय बेवफा आहे का रे ? , . तो :- बेवफा तर आपले नशीब आहे ग तू बिलकुल नाही .. ती :- मग असे कर ना, विसरून जा मला तू कायमचा ... तो :- (जरा हसतच म्हणाला ) माझे अस्तित्व आहेस ग तू , तुला विसरायला तू एखादे स्वप्न नाहीस..

0 likes 0 shares
WhatsApp