Back to feed
R
Rudra Verma Love · Marathi · Life

एक तरी मुलगी असावी उमलताना बघावी नाजूक नखरे करताना न्याहाळायला मिळावी ।। १ ।। एक तरी मुलगी असावी साजिरी गोजिरी दिसावी नाना मागण्या पुरवताना तारांबळ माझी उडावी ।। २ ।। एक तरी मुलगी असावी मैचिंग करताना बघावी नटता नटता तिने आईला नात्यातली गम्मत शिकवावी ।। ३ ।। एक तरी मुलगी असावी जवळ येउन बसावी मनातली गुपितं तिने हळूच कानात सांगावी ।। ४ ।। 💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝

0 likes 0 shares
WhatsApp