Back to feed
I
Ira Kapoor Love · Marathi · Life

एक दिवस असा होता की कुणीतरी माझ्या फोनची वाट पहायचं स्वतःच फोन करुन मनसोक्त बोलायचं त्या गोड गप्पामध्ये रंगायचं एक दिवस असा होता की कुणीतरी तासनतास माझ्याशी गप्पा मारायचं एक दिवस असा होता की मनमोकळेपणानं सर्व काही सांगायच ं आज दिवस असा आहे की कुणीतरी विणाकारण मला टाळायचं नसलेलं काम सबब म्हणून सांगायचं वेळ देऊनही फोन नाही करायच ं आज दिवस असा आहे की मी माझं नातं मनापासुन जपायचं मिळालेल्या वागणुकितुन मन मात्र दुखायचं पण माझं हे दु:ख कोणाला कळायच ं आज प्रश्न असा आहे की का कुणाशी स्वार्थासाठी नातं जोडायचं का प्रेमाचं नाव घेऊन ताळ तंत्र सोडायचं का स्वतःचं व दुस-याचं जीवन भकास करायच ं मित्रा, आपल्याल नाही हे जमायचं दु:खातही आपण मात्र हसायचं कधी कधी एकांतजागी खुप खुप रडायचं चेह-यावर चेहरा लावुन जगायचं...!

0 likes 0 shares
WhatsApp