एका प्रेम कहाणीत ती नसते , फक्त तो असतो चालता बोलता तिच्या आभासात जगतो ती तर दिसत नाही ,मग हा कुणाश गप्पा मारतो विचारल तर म्हणतो , मी तिच्यावर प्रेम करतो तिच्यासाठी जिंकलेले डाव पुन्हा पुन्हा हरतो प्रत्येक क्षण तिच्याविषयी बोलतो आठवणीत तिच्या गुपचूप रडतो दुसर्यांना हसण शिकवून स्वतःच्या चेहर्यावरच दुख लपवतो तिच्या फोटोकडे पाहून सारे सुख वाटून घेतो तिला भेटण्याची आतुरतेने वाट पाहतो तीन स्वप्नं यायला यायला उशीर केला म्हणून तिच्यावर नकळत रागावतो . तिच्याशी भाडतो अन पुन्हा तिच्यावर रुसतो गणपतीच्या मिरवणुकीत तिच्याबरोबर मनसोक्त नाचतो ती आयुष्यभर आनंदी रहावी म्हणून रोजच्या नमाज मध्ये प्रथांना करतो डोळे बंद करून नाताळच्या तिला शुभेच्छा देतो त्याला पाहतानाच कळत एका प्रेमकहाणीत ती नसते फक्त तोच असतो
0 likes
0 shares