❤ एक प्रेमकथा....❤ प्रेमामध्ये माणूस सगळं काही विसरतो हे त्याने फक्त ऐकलं होता,प्रेम म्हणजे फक्त लोक शरीरसुखासाठी नाटक करतात असं त्याला वाटायचं. प्रेमाला नाटक मानणारे तो प्रेमी युगल बघून हसायचा, प्रेम म्हणजे फक्त timepass असं त्याला वाटायचं.. अचानक एक दिवस मित्रांसोबत मुलींची चेष्टा करत जात असताना त्याला एक मुलगी दिसली...सगळ्या मुलींची चेष्टा करणाऱ्या त्यांच्या ग्रुप मधील एका मुलाने तिचीहि चेष्टा केली, पण आयुष्यात मुलींबद्दल अतिशय वाईटमत असलेल्या त्याने मात्र त्या मुलाला एक जोरदार वाजवली, त्या मुलीविषयी त्याच्या मनात मात्र एक वेगळीच भावना निर्माण झाली होती, मित्रांना हि त्याचं हे वागणं बघून तो बदललाय याची जाणीव झाली. रात्री घरी गेल्यानंतर तो फक्त तिच्याच विषयी विचार करू लागला..दुसऱ्याच दिवशी त्याने त्या मुलीची सगळी माहिती काढली...फक्त ती दिसेल म्हणून तो कॉलेज ला जायला लागला, आणि असाच एक दिवस घरात तिच्या बद्दल विचार करत असताना, त्याला आईचा आवाज आला.आई ने त्याला नातेवाईकांकडे भेटायला जायचा आहे, तू बाईक चालवायला ये म्हणून सांगितला, त्याला राग आला कारण तो तिच्या विचारात मग्न होता, तो आईला घेऊन नातेवाईकांकडे पोहचला,पण हे सगळे नातेवाईक त्याच्यासाठी नवीन होते, अचानक घरात बसलेला असताना एक सुंदर परी त्याच्या समोर येऊन उभी राहिली,त्याने नकळत वर बघितला तर त्याला तेच डोळे दिसले ज्यांच्या प्रेमात तो फार आधीच पडला होता, त्याचा आनंद आकाशात हिमावणार नाही इतका खुश तो झाला होता, पण दुसर्याच क्षणाला त्याला आठवण झाली कि हे तर आपले नातेवाईक आहेत.. स्वताला फार लकी समजणाऱ्या त्या जीवाला अचानक आपण फार अनलकी आहोत याची जाणीव झाली.. पुढे त्याने तिचा मोबाईल नंबर घेतला पण तरीही तो तिला सगळं सांगायला घाबरत होता,रोज तिच्याशी chatting करून त्याला तिची सवय झाली होती,तिच्या त्या मंजुळ आणि स्वच्छ स्वभावाने तो तिच्या प्रेमात अजूनच न्याहाळून गेला होता, पण ती नातेवाईक असल्यामुलातो तिला सांगायला घाबरत होता, तिला हि त्याची सवय झाली होती आणि नकळत ती पण आता त्याच्यावर प्रेम करू लागली होती, हे सगळं ध्यानात घेऊन न राहवून त्याने अचानक एक दिवस तिला प्रपोज केला, तिच्या हि मनावर त्याचं राज्य झाला होतं म्हणून तिने हि होकार दिला, तिला नेहमी खुश ठेवणार, तिच्यासाठी काहीही करणार असं जणू त्याने ठरवूनच टाकलं होतं, आता तो तिच्यावर प्रेम करत नव्हता तर तिच्या त्या गोड स्वभावावर प्रेमकरू लागला होता, होतीच ती तशी,सगळ्यांना समजून घेणारी,त्याच्या वर फार प्रेम करणारी. कधी त्याचं काही चुकलं तर त्याला समजाऊन परत अशी चूक करू नको सांगणारी..दोघां नाहि आता एकामेकांना गमवणार तर नाही अशी भीती वाटू लागली होती, तिला hugकेला कि तो सगळा जग विसरून त्या दोघांच्या वेगळ्याच आयुष्य्यात हरवून जायचा.. ते दोघं एकामेकांशिवाय १ दिवस पण राहू शकत नव्हते, रोज तिच्या आठवणीत तो वेगळंच जीवन जगू लागला होता,, त्याला तिच्या आधीच्या प्रेमाबद्दल पण माहित होतं पण तरीही तिचा स्वाभिमान दुखवू नये म्हणून तो तिला त्याबद्दल काहीच बोलला नव्हता, पण एक दिवस तिनेच त्याला सगळं काही सांगितला आणि त्याला तिचा अभिमान वाटायला लागला, रोजच त्यांचं एकामेकावरचं प्रेम वाढू लागलं..... पण आता वेळ बदलली होती, तिचा त्याच्याबद्दलच प्रेम हळूहळू कमी व्हायला लागला होता, त्याच्याहि ते लक्षात आलं होतं, त्याने तसं तिला विचारलं तर ती त्याच्याशी भांडू लागली, तो असा एकमेव मुलगा असेल ज्याचं प्रेम तिला hug केल्यानंतर अजून वाढलं होतं, बाकी मुलांसारखा मजा करून सोडणारा तो नव्हता, त्याला फक्त ती पाहिजे होती, तिचा सहवास पाहिजे होता.. तिला मी लग्न नंतर महाराणी सारखा सांभाळेल, तिला हवं ते देईल असं त्याने ठरवलं होतं, पण आता ती पूर्ण बदलली होती......... एक दिवस त्याच्यासाठी आत्महत्या करीन अशी बोलणारी ती आता त्याने हात कापून घेतला तरी काही बोलली नव्हती... त्याला सगळं समजत होतं, पण तरीही स्वतः कमी पण घेऊन त्याने तिला समजाऊन सांगण्याचा फार प्रयत्न केला.. पण तिला काहीही ऐकायचं नव्हता, तिच्यावर एवढा प्रेम करणाऱ्या त्याची तिला अजिबात काळजी राहिली नव्हती, तो रात्री न जेवताच झोपू लागला, दिवसभर वेड्यासारखा तिला बघत पाईच फिरू लागला, तो तिला बघण्यासाठी गावात पायीच चालत गेला, नशीबाने त्याला ती दिसली हि, पण तिच्या चेहऱ्यावरील reaction बघून त्याला फार वाईट वाटलं, काल तिचा fb acnt hack झाला होता, त्याने तिला fb वर फार शोधला पण ती त्याला सापडली नव्हती, त्याला वाटला तिने तिचा account deactivate केला असेल, त्याच्या message ला आता ती reply सुद्धा करत नव्हती....कदाचि त तिला कोणी दुसरा मिळाला असेल, पण प्रेम हे feelings वर अवलंबून असतं face,beauty वर नही हे त्या शोनाला कोण सांगेल...यात तिची हि काही चूक नव्हती कारण तिला आता तिचं fb acnt त्याच्या पेक्षा हि प्यारा झाला होता... आज तिच्या नजरेत तो कोणीच नहिये, पण तो तिच्यावर प्रेम करायचा, करतोय,आणि नेहमी करत राहणार... त्याला प्रेमाची खरी def कळली होती.... तिला हि त्याच्या प्रेमाची किंमत कधी तरी कळेल पण तो पर्यंत वेळ निघून गेलेली असेल..... आणि जो प्रेम करतो तो त्याची gf त्याच्याशी कशीही वागली तरी तिला कधी त्रास देत नाही, जसा तिला वाटतंय कि तिचाacnt त्यानेच hack केला.... शेवटी तो तिच्या ख़ुशी तच खुश आहे, तिच्या सगळ्या सुखदुक्खात तो तिची साथ देणारच..!! आणि आज जरी तो रोज रात्री तिच्या आठवणीत रडत असला तरी ती खुश असली तर तो नेहमी hasatach राहील, कारण त्याला माहित आहे,ती त्याच्या शी कितीही वाईट वागत असली तरी सुद्धा तिला तो आज हि आवडतो..
0 likes
0 shares