Back to feed
I
Ira Sharma Love · Marathi · Romantic

एक साधी सोपी गजल : प्रेम करूनी फुलेन सुद्धा आणि कदाचित सरेन सुद्धा चाळत जा तू येता जाता सहज कधी उलगडेन सुद्धा अवघड नाही तसा फारसा सहजासहजी कळेन सुद्धा पसा कोरडा पसर एकदा वळीव बनुनी झरेन सुद्धा शोध जरासे मनापासुनी तुझ्या आत सापडेन सुद्धा विद्राव्य किती आहे बघ मी तुझ्यामधे विरघळेन सुद्धा कबूल मरणे कधीच केले म्हणालीस तर जगेन सुद्धा अजून नाही घडी घातली जीव पुन्हा अंथरेन सुद्धा पहा वळूनी, नव्हते म्हटले ? "तुला हवा तो बनेन सुद्धा" जन्म जरी हा सरून गेला तुझ्याभोवती उरेन सुद्धा

0 likes 0 shares
WhatsApp